Co- Curricular
वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या उपक्रमा अंतर्गत ग्रंथालय विभागामार्फत घेण्यात आलेले विविध उपक्रम
डी जे सामंत वरिष्ठ महाविद्यालयात सामूहिक वाचन उपक्रम
संपन्न पाली येथील डी जे सामंत महाविद्यालयात ग्रंथालय विभागामार्फत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभिनव उपक्रमा अंतर्गत सामूहिक वाचन उपक्रम घेण्यात आला. डिजिटल युगात वाचन संस्कृती लोप पावत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी मोबाईलच्या अतिवापरामुळे पुस्तकापासून दूर चालला आहे. यासाठी वाचन संस्कृती जोपासत असताना ग्रंथांचे महत्त्व पटवून देणे अपरिहार्य आहे म्हणून या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आवडीच्या पुस्तकांचे सामूहिक वाचनाचे आयोजन करण्यात आले. सदर उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच पुस्तक वाचन, पुस्तक परीक्षण कसे करावे याची माहिती देण्यासाठी वाचन कौशल्य कार्य शाळा आयोजित करण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
१३ व १४ जानेवारीचे २०२५ शाळा संपर्क अभियान २.०
१३ जानेवारी २०२५ सोमवार रोजी डी जे सामंत वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाली रत्नागिरी आणि १४ जानेवारी २०२५ मंगळवार रोजी डी जे सामंत इंग्लिश मीडियम स्कूल पाली रत्नागिरी येथे स्कूल कनेक्ट २.०हे संपर्क अभियान राबविण्यात आले. या अभियानाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. या अभियानात PPT च्या माध्यमातून NEP २०२० मधील विद्यार्थी केंद्रीय बदलांविषयी आणि त्यांच्या हितकारी परिणामांविषयी विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बहु विद्याशाखीय लवचिक अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. मूल्यमापनातील श्रेयांक पद्धती समजावून सांगण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या शिष्यवृत्ती विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना बारावीनंतर त्यांच्या आवडीचे अभ्यासक्रम निवडण्यासंबंधीत मार्गदर्शन करण्यात आले. अशा पद्धतीने या अभियानाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला. या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे पत्ते, सही, भ्रमणध्वनी क्रमांक उपस्थित पत्रकाच्या माध्यमातून घेण्यात आले.
Konkan Wild Vegetable & Ayurvedik Plant Exhibition
Presentation Of Konkan Wild Vegetable & Ayurvedik Plant
Ganpati Immersion Site Cleanliness Drive
Introduction to Vipassana Meditation & Anapanasati Meditation 1st Workshop
Date – 04/10/2025
D.J.Samant College & Vipassana Center Ratnagiri has jointly signed on MOU regarding this educational initiative, collaboration for stress Management of Students &teacher, & in connection with it. “Introduction to Vipassana Meditation & Anapanasati Meditation 1st Workshop” was conducted.
Coming Soon
Coming Soon











